
नदीचे नाव:-
अग्रणी नदी.
जिल्हा:- सांगली.
नदी प्रहरी
सदस्य:- श्री. नरेंद्र चुघ.
श्री. आबासाहेब शिंदे.
1. चला जणुया नदीला या अभियाना विषयी
माहिती..
आपल्या देशाला स्वातंत्र्य
मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याने संपूर्ण देशभरामध्ये “स्वतंत्र्याच्या
अमृत महोत्सव” हा उत्सव वेगवेगळे उपक्रम साजरे करून मोठ्या आनंदाने आणि
उत्साहाने साजरा केला जात होता. या काळात तात्कालीन वन व सांस्कृतिक कार्यमंत्री
मा.श्री. सुधीर मुनगंटीवार आणि जागतिक जलतज्ञ जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंहजी यांची
भेट झाली. चर्चा करत असताना जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंहजी यांनी एक मुद्दा मांडला तो
म्हणजे, आपण संपूर्ण देशभरात त्याच प्रमाणे आपल्या
महाराष्ट्रातही स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. 1947 सली जेंव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले
तेव्हा मात्र आपल्या नद्या अमृतवाहिनी होत्या. त्या शुध्द, अविरल आणि निर्मळ वाहत होत्या. म्हणजेच
आपल्या नद्यांमधून अमृत वाहत होते. आता आपल्या नद्या अमृतवाहिनी राहिल्या आहेत
का? का त्या विषवाहिनी झाल्या आहेत. आपल्या
नद्यांमध्ये जर अमृत वाहत नसेल तर आपण अमृत महोत्सवी वर्ष कसे साजरे करू शकतो.
डॉ.राजेंद्रसिंहजी पुढे बोलताना म्हणाले
आपल्या देशातील 99% नद्यांचा उगम हा वन जमिनीतून होतो. त्यामुळे वन विभागाने पुढाकार
घेऊन नद्यांची सद्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी अभ्यास दौरा करून नदिला शुध्द, अविरल आणी निर्मळ (अमृतवाहिनी) म्हणजेच
महाराष्ट्राला पुर आणि दुष्काळ मुक्त बनवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे या संदर्भात
कृत आराखडा तयार करण्याच्या दृष्टहीने नद्यांची यात्रा करणे
अत्यंत गरजेचे आहे.
या नदी यात्रेला (अभ्यास
दौऱ्याला) "चला जाणुया नदीला" असे नाव देण्यात आले. महाराष्ट्र
शासनाने 30 सप्टेंबर 2022 रोजी 'शासन निर्णय' निर्गमित केला या शासन निर्णयाद्वारे मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली तर
प्रधान सचिव वने यांच्या कार्याध्यक्षते खाली 'चला जाणुया
नदीला' या अभियानाची एक राज्यस्तरीय समितीची गठित
केली. या समितीत मध्ये शासनाचे वेगवेगळ्या विभागाचे प्रधान सचिव आणि जल
बिरादरीच्या व्यक्तींची अशासकीय सदस्य म्हणून आशा एकूण 30 सदस्यांची निवड करण्यात
आली.
1.महाराष्ट्राला वारंवार भेडसावणाऱ्या पूर आणि
दुष्काळ या समस्या पासून मुक्तीसाठी नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे.
2. अभियानांतर्गत जनसामान्यांना नदी साक्षर
करण्याबाबत उपाययोजना आखणे व अंमलबजावणीसाठी यंत्रणा निश्चित करणे.
3.नदी ला अमृतवाहिनी बनवण्यासाठी मसुदा तयार
करणे.
4. नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत
प्रचार व प्रसार रूपरेषा आखणे.
5. नदीचा तट, प्रवाह, जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार व
प्रसार या बाबत नियोजन करणे.
6. नदीच्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करून
त्यावर संबंधितांना कार्यवाही अहवाल सादर करणे.
7. पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर
उंचावणे, जनजागृती करण्याबाबत आकृतीबंध तयार करणे.
8. अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास आणि त्याचा नदी आणि मानवी
जीवनावर होणारा परिणाम अभ्यासणे व त्याचा प्रचार व प्रसार करणे बाबत आखणी करणे.
9. महाराष्ट्रातील सुमारे 75 नदी खोऱ्यातून नदी संवाद यात्रा आयोजित
करण्याबाबत आराखडा तयार करून अंमलबजावणी करणे.
10 शासन, समाज आणि नदीवर
काम करणाऱ्या संस्थे मध्ये सुसुत्रता आणण्यासाठी प्रयत्न करणे.
11 स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका आणि
महानगरपालिका) यांचे जल व्यवस्थापन अभ्यासणे, त्यातील उणीवा
आणि उत्कृष्ट उदाहरणे अभ्यासणे, त्याचे
निराकरण करण्यास लोकसंवाद घडविणे.
12. नदी, समाज आणि शासन
यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे.
आशा एकूण 12 गोष्टींचे ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर
ठेवून “चला जाणुया नदीला” या राज्य स्तरीय समितीची स्थापना
करण्यात आली. या अनुषंगाने 02 ऑक्टोंबर 2022 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी
वर्धा जिल्ह्यातील महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमातून महाराष्ट्राचे
तात्कालीन उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस, तात्कालीन वने व सांस्कृतिक
कार्यमंत्री मा.श्री. सुधीर (भाऊ) मुनगंटीवार आणि जलपुरुष
डॉ. राजेंद्रसिंहजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये “चला जाणुया नदीला” या अभियानाची
सुरुवात करण्यात आली. या अभियाना अंतर्गत गेल्या 2 ते 3 दशकांपासून नदीवर स्वयंप्रेरणेने काम
करणाऱ्या नदी प्रहरी यांची तीन दिवसीय कार्यशाळा जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंहजी
यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
चला जाणूया नदीला या अभियानाच्या अंतर्गत
महाराष्ट्रातील 75 नद्या निवडून
त्यावर यात्रा करून महाराष्ट्राला पुर व दुष्काळ मुक्त कण्याच्या उद्देशाने नद्या
अमृतवाहिनी (शुध्द, अविरल आणि
निर्मळ) बनवण्यासाठी त्यांचा “सद्य परिस्थिती अहवाल” आणि “कृती
आराखडा” करण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु महाराष्ट्रातील गोदावरी खोरे, कृष्णा खोरे, तापी खोरे, नर्मदा खोरे
आणि पश्चिम वाहिनी वाहणाऱ्या नद्या आशा 5 प्रमुख नदी खोऱ्यातुन एकूण 108 नद्यांची निवड "चला जाणूया
नदीला" अभियानात करुन या 108 नदीची यात्रा
सुरू झाली.
या 108 नद्यांची सुची आणि वरील ठरल्याप्रमाणे 12 उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून प्रत्यक्ष
कार्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 14 ऑक्टोंबर 2022 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून एक
जिल्हा स्तरावर “चला जाणुया नदीला” या अभियानाची जिल्हा स्तरीय समिती गठीत
केली. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या सह अध्यक्षतेखाली
शासनाचे वेगवेगळे 27 विभाग व
प्रत्येक नदीवर 2 अशासकीय सदस्य अशी या समितीची रचना करण्यात आली. या समिती
अंतर्गत वरील 12 कार्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्यक्ष
नदी यात्रा करण्याचे निश्चित करण्यात आले. या अभियानाला बळकट करण्यासाठी
महाराष्ट्र शासनाने 30 सप्टेंबर 2022 (संकीर्ण 8222/ प्र.क्र.276/ सां.का. 4), 14 ऑक्टोंबर 2022 (संगणक संकेताक क्रमांक 202210141942427823),
29 नोव्हेंबर 2022 (संगणक संकेताक
क्रमांक 202211291658085523), 20 जानेवारी 2023 (संगणक संकेताक क्रमांक 202301201449283923), 19 ऑक्टोंबर 2023 (संगणक संकेताक क्रमांक 202310191522118223)
आणि 16
जानेवारी 2024 (संगणक संकेताक
क्रमांक 202401161854264723) आसे एकुण 6 शासन निर्णय निर्गमित केले
आहेत.
वरील 108 नद्यांमध्ये कृष्णा खोऱ्यातील
प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीचा
समावेश या “चला जाणुया नदीला” अभियानात करण्यात आलेला
आहे.


Water Availability in Maharashtra State
सांगली जिल्ह्या विषयी माहिती :
कृष्णेच्या तिरावर वसलेला पश्चिम
महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा सांगली! पुर्वी दक्षिण सातारा म्हणुन ओळख असलेला
हा जिल्हा आता सांगली म्हणुन परिचीत झालाय! नाटक परंपरेला जन्माला घालणारा
हा जिल्हा ’’नाटयपंढरी’’ म्हणुन देखील ओळखला जातो. पं. विष्णुदास भावेंनी पहिले मराठी नाटक ’’सिता स्वयंवर’’ हे नाटक या ठिकाणीच सादर केले त्यांचा जन्म
देखील या सांगलीतलाच!
साखर कारखान्यांकरता देखील सांगली जिल्हा
ओळखला जातो. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना या क्षेत्रातील आशियातला
नं. १ चा सहकारी साखर कारखाना आहे. आशियातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ
देखील या जिल्हयात आहे आणि आता तर द्राक्षांच्या उत्पादनाकरता देखील हा जिल्हा
ओळखल्या जाऊ लागला आहे.
चांगल्या गुणवत्तेचे फायबर या जिल्हयात तयार
होते. सुती कापड, तेलाच्या मिल्स, पीतळ आणि तांब्याच्या वस्तु बनवणारे कारखाने या जिल्हयात मोठया
प्रमाणात पहायला मिळतात. सांगली हे शहर पहेलवानांकरता आणि कुस्तीगिरांकरता देखील चांगलेच
सुपरीचीत आहे त्यामुळे कुस्तीगिरांचे शहर अशी देखील सांगलीची ओळखी आपल्याला सांगता
येईल.
सांगली
जिल्ह्यात मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव असे एकूण दहा तालुके आहेत.
सांगली जिल्हयाविषयीची वैशिष्टयपुर्ण
माहिती :
·
लोकसंख्या २८,२०,५७५
·
क्षेत्रफळ ८५७८ वर्ग कि.मी.
·
एकुण गावं ७३५
·
तलुके १०
·
साक्षरतेचे प्रमाण ८२.४१%